मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी ए ट्री पेरेंट’ या मेगा वृक्ष मोहिमेचे हेमा मालिनी यांनी केले उद्घाटन
नुकत्याच झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने मुंबईच्या हिरव्यागार संपदेला धक्का लावला असून २३६३ झाडे उन्मळून पडली तर अनेक झाडांच्या फांद्याही तुटून पडलेल्या आहेत. एका सर्वेक्षणानुसार वादळात उन्मळून पडलेल्या झाडांपैकी एकूण ७० टक्के झाडे ही मूळ मुंबईतील नाहीत.
मुंबई महापालिकेने मातीची गुणवत्ता, दमट हवामान, स्थानिक कृषी- हवामानविषयक परिस्थितीचा अभ्यास करून मुंबईत लागवड करता येईल अशा ४१ स्थानिक झाडांची यादी तयार केली आहे. ही झाडे मुंबई आणि कोकणातील काही भागात लावली जाणार आहेत. वड, पिंपळ, उंबर, कांचन, कदंब, गुंज, पळस, लिंबू, महागोनी, मोह, बहावा, साग, अर्जुन, ऐन, किंजल, सीता अशोक, उंडाळ, नागकेशर, चंपा, शीवन, करंज, बकुळ, बेल, तामण, हिरडा, बेहडा, नारळ, आवळा, खैर, टेटू, आंबा, पुत्रंजीवा, जंगली बदाम, बिब्बा, पारिजातक, रीटा, चंदन, फणस आणि चाफा ही यापैकी काही झाडे आहेत.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला, मुंबई मनपाच्या के पश्चिम वार्डचे सहाय्यक आयुक्त श्री. विश्वास मोते यांच्यासह मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाऊंडेशन सोसायटीने 'ट्री पेरेंट -अॅडॉप्ट फॉलन ट्री पिट' अभियान सुरू केले आहे. या अभियानात येथील नागरिकांना एक झाड दत्तक घेण्यास सांगण्यात येणार आहे. के पश्चिम भागात एकूण ३४८ झाडे उन्मळून पडलेली आहेत. ही झाडे दत्तक घेऊन त्यांचे वृक्षारोपण करण्याची ही योजना आहे.
अंधेरीत पुन्हा झाडांची वाढ होऊन परिसर पूर्वीप्रमाणे हिरवागार व्हावा असे सांगून सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी म्हटले, “या मोहिमेचे उद्दीष्ट म्हणजे एखाद्या झाडाची लागवड करणे आणि त्याची काळजी घेणे यासाठी नागरिक आणि सोसायट्यांना प्रेरित करणे हे आहे. मनपाच्या गार्डन विभागाशी सल्लामसलत करून वृक्षांच्या विविध मूळ प्रजाती, त्यांच्या वाढीच्या पद्धतींबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि शहरातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करून त्यांच्यात झाडाबाबत मालकीची भावना निर्माण करणे हेदेखील यामागील उद्दीष्ट आहे."
मेक अर्थ ग्रीन अगेन मेगा फाउंडेशनच्या संस्थापिका अनुषा श्रीनिवासन अय्यर यांनी या मोहिमेबाबत बोलताना सांगितले, "मुंबई मनपाच्या गार्डन विभागासोबत संयुक्तपणे आम्ही जी झाडे पुन्हा लावणार आहोत त्यात ताम्हन, जांभुळ, बदाम आणि इतर झाडांच्या मूळ प्रजाती आहेत. आपल्याकडे पाण्याची पातळी जास्त असल्याने मुळे पाण्याच्या शोधात फारशी खोलवर जात नाहीत. म्हणूनच ३० फुटांपेक्षा जास्त वाढ न होणारी प्रजाती वाढविणे आम्हाला योग्य वाटते. वृक्ष पालक बनून झाडे दत्तक घ्या अशी विनंती आम्ही स्थानिकांना करीत आहोत. त्यांना आवश्यक असलेले मार्गदर्शन किंवा मदत आम्ही कधीही देण्यास तयार आहोत. पर्यावरणाचे रक्षण करणार्यांच्या मदतीसाठी सहाय्यक आयुक्त विश्वास मोते नेहमीच अग्रेसर असतात. आपल्या हिरव्या वनसंपदेचं रक्षण करण्यासाठी आम्ही समाजाला सोबत घेऊ इच्छित आहोत. आपण मागे सोडलेल्या हिरव्या वनसंपदेवरच आपले उद्याचे भविष्य अवलंबून आहे.”
या मोहिमेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता लोकसभेच्या खासदार श्रीमती हेमा मालिनी यांच्या हस्ते करण्यात आले. येथे उन्मळून पडलेल्या ४५ फुटांच्या ताम्हण झाडाचे वृक्षारोपण हेमा मालिनी यांनी केले. यावेळी नगरसेवक रेणु हंसराज, के-पश्चिमचे सहाय्यक आयुक्त श्री. विश्वास मोते, मेक अर्थ ग्रीन अगेन एमईजीए फाउंडेशनच्या अनुशा श्रीनिवासन अय्यर, वृक्षचे शान लालवाणी, अॅडॉप्ट ए फॉलन ट्री पिटचे नोडल अधिकारी श्री. योगेंद्र कचवा आणि मनपाच्या के-पश्चिम कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
हेमा मालिनी यांनी मोहिमेची सुरूवात करताना म्हटले, "आपण प्रत्येकाने आपले पर्यावरण जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले जीवन पृथ्वी मातेशी जोडलेले आहे आणि तिचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. वृक्ष दत्तक घेणे त्या दिशेनेच एक पाऊल आहे,"
संवाददाता -
शाहिद आलम


0 comments: